
no images were found
दक्षिण कोरिया येथे झालेल्या तायक्वॅान्डो स्पर्धेत कोल्हापूर च्या खेळाडूंचे भरघोश यश
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : दक्षिण कोरिया येथे झालेल्या सोळाव्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो स्पर्धा मुजुवॉन पार्क येथील क्रीडासंकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेत 23 देशातील दोन हजार पाचशे हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
आपल्या भारतीय संघातील कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्टस ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कोल्हापूर च्या निखिल माने, अभीनव शेटे, यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत स्पायरिंग व पुमसे अशा दोन प्रकारांत च्या दोन खेळाडूंनी अनुक्रमे तीन सुवर्ण व एक कास्य पदकांची कमाई केली.
वरील यशस्वी खेळाडूंना जीएसटीआरसी कोल्हापूरचे मास्टर अमोल भोसले सर, यांचे मार्गदर्शन आणि जेएसटीएआरसी चे सीईओ ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांचे प्रोत्साहन लाभले.