no images were found
चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये आनंदोत्सव
कसबा बावडा ( प्रतिनिधी ) : डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा येथे चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल स्टाफ आणि विद्यार्थी यांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडंट आणि सध्या सध्या एन .डी. आर. एफ. भुवनेश्वर येथे कार्यरत असलेले गौरव झंगटे प्रमुख उपस्थित होते .
यावेळी बोलताना गौरव झंगटे यांनी सांगितले की, देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत.
कार्यकारी संचालक डॉ.ए.के गुप्ता यांनी या मोहिमेमध्ये अभियंत्यांनी आणि शास्त्रज्ञांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले.
प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी चांद्रयान ३ मोहिमेचे यश हा आपल्या सर्वांची छाती अभिमानाने फुलून येणारा क्षण आहे असे सांगितले.
यावेळी उप प्राचार्य मीनाक्षी पाटील, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. बी .जी .शिंदे ,प्रा. महेश रेणके ,प्रा. अक्षय करपे, रजिस्ट्रार प्रा. सचिन जडगे ,प्रा. व्ही .पी .पाटील ,प्रा.राज अलास्कर यांच्यासह स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.