
no images were found
‘प्रेमात आहेच मी’ – प्राजक्ता माळी
मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत येते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर ती नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला येते. मात्र बऱ्याच महिन्यांनी अभिनेत्रीचा नवाकोरा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्राजक्ताचे चाहते उत्सुक आहेत. ‘तीन अडकून सीताराम’ असं या सिनेमाचं नाव असून ऋषीकेश जोशी यांनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमात प्राजक्तासह आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे आणि वैभव तत्ववादी अशी स्टारकास्ट असणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ही संपूर्ण टीम व्यग्र असताना या दरम्यान प्राजक्ताची लव्ह लाइफ चर्चेत आली आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले की खऱ्या आयुष्यात प्राजक्ता माळी कधी प्रेमात पडणार आणि कधी लग्नाच्या बेडीत अडकणार? यावर उत्तर देताना प्राजक्ता आधी गंमतीत म्हणाली की, ‘वाट बघा’. त्यानंतर तिने असं उत्तर दिले की, ‘प्रेमात आहेच मी, स्वत:च्या आयुष्याच्या… मला असं वाटतं की प्रत्येकानेच असलं पाहिजे. कोणाच्या दुसऱ्याच्या प्रेमात का पडायचं? तुम्ही स्वत:च्या आयुष्याच्याही प्रेमात असू शकता, जी की मी पूर्णपणे आहे. मी सतत अशी हसत असते ते या प्रेमामुळेच शक्य आहे.’ प्राजक्ता पुढे म्हणाली की, ‘बेडीत अडकणं, कुठेतरी बंधनात अडकून राहणं हे माझ्या स्वभावात नाही. हे माझ्या स्वभावाच्या विरोधात आहे, कदाचित होणारही नाही. काही सांगता येत नाही.