Home मनोरंजन कलाकारांनी व्‍यक्‍त केली चहाप्रती त्‍यांची आवड!

कलाकारांनी व्‍यक्‍त केली चहाप्रती त्‍यांची आवड!

2 min read
0
0
22

no images were found

कलाकारांनी व्‍यक्‍त केली चहाप्रती त्‍यांची आवड!

आपल्‍यापैकी अनेकांना कपभर चहाचा आस्‍वाद घेण्‍यामधून कम्‍फर्ट मिळतो. पण शूटिंगचे व्‍यस्‍त वेळापत्रक, लवकर कॉल टाइम्‍स आणि भावनिकदृष्‍ट्या प्रखर सीन्‍सच्‍या अवतीभोवती गुंतलेल्‍या कलाकारांसाठी चहाचे महत्त्व मोठे आहे. नॅशनल टी डे निमित्त एण्‍ड टीव्‍ही कलाकार दैनंदिन सोबती असलेल्‍या चहासोबतच्‍या त्‍यांच्‍या नात्‍याबाबत सांगत आहेत, जेथे चहा त्‍यांना व्‍यस्‍त कामकाजादरम्‍यान ऊर्जा, उबदारपणा आणि आरामदायी क्षणांचा अनुभव देतो. स्मिता साबळे (मालिका ‘भीमा’मधील धनिया), योगेश त्रिपाठी (मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दरोगा हप्‍पू सिंग) आणि शुभांगी अत्रे (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अंगूरी भाबी) त्‍यांच्‍या आवडत्‍या चहामधून कशाप्रकारे आरामदायीपणा व शांतता मिळते, तसेच चहा त्‍यांच्‍या व्‍यस्‍त जीवनामध्‍ये शांतमय व महत्त्वाची भूमिका कशाप्रकारे बजावतो याबाबत सांगत आहेत. मालिका ‘भीमा’मध्‍ये धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्‍हणाल्‍या, ”चहा माझा शांतमयरित्‍या उत्‍साहित करणारा सोबती आहे. तो मला कोणत्‍याही शब्‍दांशिवाय समजून घेतो. पहाटेच्‍या वेळी इतर लोक अर्धवट झोपेत असताना मी लवकर सेटवर गेल्‍यानंतर स्‍वादिष्‍ट मसाला चहा पिते, जो मला उबदारपणा देतो आणि म्‍हणतो की ‘तुला आता ऊर्जा मिळाली आहे’. मसाला चहाचा आस्‍वाद घेतल्‍यानंतर मला त्‍वरित ऊर्जा मिळते. थंडीच्‍या दिवसात मी आल्‍याची चहा पिते. चहाचा आस्‍वाद घेतल्‍यानंतर मनात निर्माण होणाऱ्या अनुभवामधून घरी असल्‍यासारखे वाटते. कडक उन्‍हाळ्यामधील शूटिंगदरम्‍यान मी ग्‍लासभर थंडगार लेमन टी पिते. हा चहा स्‍वादिष्‍ट, थंड असतो आणि त्‍वरित उत्‍साह वाढवतो. ग्रीन टीचा आस्‍वाद घेतल्‍यानंतर भावनिकदृष्‍ट्या प्रखर सीन्‍स देखील काहीसे सोपे वाटतात. हा चहा मला उत्‍साहित करतो. माझ्यासाठी चहा फक्‍त पेय नसून मूड उत्‍साहित करणारा आणि शांतमय भावना देणारा सोबती आहे.”

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्‍पू सिंग म्‍हणाले, ”कुल्‍हडमध्‍ये चहाचा आस्‍वाद माझ्यासाठी मेडिटेशनसारखे आहे. व्‍यस्‍त दिवसासाठी तयारी करायची असो किंवा काहीसा आराम करायचा असो चहा नेहमी माझा मूड उत्‍साहित करतो. मी सकाळच्‍या वेळी चहाचा आस्‍वाद घेत दिवसाची सुरूवात करतो, ज्‍यामुळे मला ऊर्जा मिळते. मला दूध, चहापत्ती, साखर, आले, वेलची आणि कधी-कधी थोडीशी काळीमिरी वापरून तयार केलेला चहा खूप आवडतो. मला चहाचा आस्‍वाद घेण्‍यासोबत चहा बनवायला देखील आवडते. मी घरी असल्‍यावर तुम्‍हाला किचनमध्‍ये माझ्या पत्‍नीसाठी व स्‍वत:साठी चहा बनवताना पाहायला मिळेल. तिला मी बनवलेला चहा खूप आवडतो. ती म्‍हणते की, माझा चहा सर्वात स्‍वादिष्‍ट आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मला ते कौतुक खूप आवडते. हे लहान शेअर केलेले टी ब्रेक्‍स व्‍यस्‍त दिवसानंतर पुन्‍हा उत्‍साहित होण्‍याचे मार्ग आहेत.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्‍हणाल्‍या, ”मी चहाप्रेमी आहे, पण मला सुगंधी चहा आवडतो. तुम्‍हाला सांगते मी अस्तित्‍वात असलेल्‍या प्रत्‍येक चहाचा आस्‍वाद घेतला आहे. मी प्रवास करते तेव्‍हा नवीन व विविध प्रकारच्‍या चहाचा शोध घेणे माझी सवय बनली आहे. मॅराकेशमधील मारोक्‍कन पुदिना चहा, जपानमधील माचा चहा किंवा चीनमधील उलोंग चहा असो मला स्‍थानिक चहांचा शोध घ्‍यायला आवडते. पण माझा आवडता चहा म्‍हणजे देसी कुल्‍हडवाली चाय, नुकतेच मी वाराणसीला गेले होते, तेथे मी या चहाचा आस्‍वाद घेतला. चहाचा आस्‍वाद घेतल्‍यानंतर त्‍वरित माझ्यामध्‍ये ऊर्जा निर्माण झाली आणि मी प्रत्‍येक सिपचा मनसोक्‍त आस्‍वाद घेतला. अर्थी फ्लेवर अत्‍यंत अद्वितीय आहे, जो तुम्‍हाला तुमच्‍या मूळ संस्‍कृतीशी संलग्‍न करतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…