
no images were found
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे “जागतिक ओझोन दिन” साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी ): ओझोन थराची गरज काय आहे हे लोकांना कळावे याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन सजरा केला जातो. या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाचे तंत्रज्ञान अधिविभाग, इंडियन सोसायटी फॉर हिटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स (ISHRAE), रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग सर्विसिंग सेक्टर सोसायटी (RASSS) आणि इन्स्टिट्यूशन इनोवेशन कौन्सिल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “ऊर्जा आणि पर्यावरणीय
समस्या” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात रोपट्यास पाणी देऊन करण्यात अली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, तसेच श्री. सुरेश पाटील (सचिव, ISHRAE) व पि. पि. पुंगावकर (राष्ट्रीय
वरिष्ठ उपाध्यक्ष, RASSS) उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के, प्र कुलगुरू प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील सर यांचे प्रोसाहन व सहकार्य लाभले आहे. ओझोन थरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवांचे हानिकारक किरणांपासून संरक्षण होत असून वाढते प्रदूषण, पर्यावरण घातक घटकांचा वाढता वापर यामुळे या थरांचे नुकसान होत आहे. या थरांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावावीत व पर्यावरण घातक घटकांचा वापर कमी करावा असा सल्ला यावेळी कार्यक्रमास संबोधित करतांना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केला. सूर्यापासून पृथ्वीवर पडणाऱ्या हानिकारक अल्ट्राव्हायवोलेट किरणांपासून ओझोन थर सर्व सजीवांचे कसे रक्षण करतो व या थरांचे मॉन्ट्रिअल प्रोटोकॉल नुसार संवर्धन कसे करता येईल याची सविस्तर माहिती यावेळी डॉ. एन. एन. शिंदे यांनी दिली.ओझोन थरांमधून पृथ्वीवर येणारी शीतकिरणे व त्यांच्या पासून निर्माण होणारी इकोसिस्टिम याची माहिती,पाण्यामध्ये असणाऱ्या मायक्रो ऑरगॅनिझमचे महत्व व त्यामुळे पर्यावरणास व मानवी जीवनास होणारे फायदे या विषयाची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना सुनील भाटवडेकर यांच्याकडून मिळाली.
पाणी हे जीवन असून मानवी कृती व अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होत आहेत त्यामुळे पाणी प्रदूषण रोखणे हि आपली नैतिक जबाबदारी आहे. पाण्याचा योग्य वापर करून व पाण्यास प्रदूषित करणाऱ्या घातक घटकांचा वापर टाळून आपण पाणीसाक्षर बनावे असे विचार यावेळी संदीप चोदनकर यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
अधिविभागाचे संचालक डॉ. एस. एन. सपली यांनी यावेळी ओझोन डीप्लेशनची प्रक्रिया, ग्रीन हाऊस ग्यास इफेक्ट व जागतिक तापमानवाढ या विषयाची माहिती दिली. तसेच या थरांचे संवर्धन करण्यासाठी रेफ्रिजिरेशन अँड एअर कंडिशनिंग यांच्या वापरामधील आधुनिकीकरण या विषयाचीही विस्तृत माहिती देऊन विद्यार्थ्यांना ओझोन थराबद्दल जागरूक केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन मेकॅनिकल विभागामधील प्रा. डॉ. ए. बी. कोळेकर ,सहाय्यक प्राध्यापक एस. बी. पोर्लेकर, गणेश शिंदे यांनी केले. विभागातील सहाय्यक प्राध्यापक पी. ए. प्रभू, एस. बी. काळे, एम ऐन व्हटकर, एम ऐन जाधव, निखिल राऊत,एच. सी. पंडित, जे. के. बागवान यांनी कार्यक्रमास मदत
केली.