
no images were found
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर(प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा आयोजित केला असून या अभियानात विविध सेवा कार्यक्रम राबविले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून उद्या रविवार दिनांक १७/०९/२०२३ रोजी भाजपा उत्तरेश्वर पेठ मंडलाच्या वतीने मस्कुती तलाव परिसरात तर लक्ष्मीपुरी मंडलाच्यावतीने शिवाजी टेक्निकल याठिकाणी आरोग्य शिबीर, मोदिजी जीवनपट प्रदर्शनी, कलश पूजन (मेरी माती मेरा देश) अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते २ यावेळेत हे शिबीर संपन्न होईल.
भाजपा जिल्हा कार्यालयात उद्या दि.१७/०९/२३ रोजी सकाळी ११ वाजता ओबीसी मोर्च्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभाचे थेट प्रेक्षपण पाहण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमांची नोंद व्हावी हि विनंती.