no images were found
जिल्ह्यात तलाठी परीक्षा पडल्या सुरळीतपणे पार
कोल्हापूर : महसूल विभागातील गट-क संवर्गातील ‘तलाठी भरती परीक्षा -सन 2023’ ही परीक्षा टी.सी.एस. आयओएन (टाटा कन्सटन्सी सर्विसेस लिमिटेड) या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने जिल्ह्यातील एकूण 8 केंद्रांवर दिनांक 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या 19 दिवसाच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षा जिल्ह्यात सुरळीतपणे पार पडल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.
परीक्षार्थी उपस्थिती व अनुपस्थिती पुढील प्रमाणे – परीक्षेकरीता परीक्षार्थी यांची संख्या :- ४९ हजार १८५, उपस्थित परीक्षार्थी यांची संख्या :- ३९ हजार ८३५, परीक्षेला बसण्यास नाकारण्यात आलेल्या विद्यार्थांची संख्या :- 5 (उशिरा आल्यामुळे), व अनुपस्थित परीक्षार्थी यांची संख्या :- ९ हजार ३४५
परीक्षा केंद्रावर नियुक्त कर्मचारी यांची माहिती पुढील प्रमाणे –
परीक्षा केंद्रावर नियुक्त केंद्र निरीक्षक :- १९, परीक्षा केंद्रावर नियुक्त सहाय्यक केंद्र निरीक्षक :- २१, प्रत्येक परीक्षा केंद्रावर नियुक्त सहाय्यक कर्मचारी :- २१, प्रत्येक परीक्षा केंद्रावर नियुक्त शिपाई कर्मचारी :- १९ व प्रत्येक परीक्षा केंद्रावर नियुक्त पोलीस कर्मचारी :- 24 (प्रतिदिन प्रति केंद्र 3/4 प्रमाणे)
परीक्षेस एकूण 28 दिव्यांग परिक्षार्थी यांनी अनुग्रह कालावधी, लेखनिक मिळण्याबाबत मागणी केलेली आहे. 28 दिव्यांग उमेदवार यांना अनुग्रह कालावधी व त्यापैकी 15 दिव्यांग परिक्षार्थी यांना लेखनिक वापरण्यासाठी मुभा देण्यात आली होती.