Home क्राईम मोबाईलवरील मेसेजला प्रतिसाद देणे पडले महागात; प्राध्यापकाला घातला ५ लाखांना गंडा

मोबाईलवरील मेसेजला प्रतिसाद देणे पडले महागात; प्राध्यापकाला घातला ५ लाखांना गंडा

3 second read
0
0
287

no images were found

मोबाईलवरील मेसेजला प्रतिसाद देणे पडले महागात; प्राध्यापकाला घातला ५ लाखांना गंडा

पुणे : सदाशिव पेठेत राहणार्‍या एका प्राध्यापकाने तुमचे सीमकार्ड २३ तासात ब्लॉक होईल, असा मेसेजला प्रतिसाद देऊन त्यातील नंबरवर संपर्क केला आणि ४ लाख ९० हजार रुपये गमावून बसले. याप्रकरणी एका ५३ वर्षाच्या प्राध्यापकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी हे एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. तुमचे जिओचे सीमकार्ड २४ तासात ब्लॉक होईल व सीम कार्ड व्हेरीफिकेशन बाकी आहे त्यासाठी संपर्कासाठी नंबर देण्यात आला होता. त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्यांना तुम्ही जिओ अ‍ॅप उघडून १० रुपयांचे रिचार्ज हे नेटबँकिंगने करा आणि फोन व्होल्डवर ठेवा, असे सांगितले. त्याप्रमाणे प्राध्यापकाने त्यावर विश्वास ठेवून १० रुपयांचे रिचार्ज केले व फोन बंद न करता होल्डवर ठेवला. फोन होल्डवर ठेवल्यानंतर त्यांनी बँकेचे लॉगीन केले आणि बँक बॅलेन्स चेक केला.तेव्हा त्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम होती. त्यामुळे ते फोनवर या व्यक्तीशी बोलत होते. त्यानंतर त्यांना ओटीपी (OTP) आला. आणि त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामधून ४ लाख ९० हजार रुपये कमी झाले. त्यानंतर त्यांनी मोबाईलवरील बोलणे बंद केले. विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…