no images were found
विखे पाटलांच्या मुख्यमंत्रिपदावरून अब्दुल सत्तारांचं वक्तव्य
कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की; मी जर हनुमानासारखा मोठा भक्त असतो, तर माझी छाती फाडून दाखवलं असतं की, माझ्या हृदयात विखे पाटीलच आहेत.
मुंबई – मागील राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत सुरुवातीला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नाव होती. मात्र आता या रस्सीखेचमध्ये आणखी काही नाव समाविष्ट होत असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच नावही समोर आलं आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत विधान केलं आहे. विखेंनी मुख्यमंत्री व्हावं का, असा प्रश्न विचारला असता, सत्तार म्हणाले की, मित्र मोठा व्हावा असं कोणाला वाटत नाही? विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं व्हावं. मी जर हनुमानासारखा मोठा भक्त असतो, तर माझी छाती फाडून दाखवलं असतं की, माझ्या हृदयात विखे पाटीलच आहेत.