no images were found
अमित शाह यांच्याविरोधात एफआयआर दाखल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अडचणीत आले आहेत. शहांच्या विधानाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्याविरोधात पोलिसात एफआयआर दाखल केली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला, डॉ. परमेश्वर आणि डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा तसेच भाजपच्या मेळाव्याच्या आयोजकांविरोधात बेंगळुरूच्या हायग्राऊंड्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. प्रक्षोभक विधाने, द्वेष पसरविणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अमित शहा म्हणाले होते की, कॉंग्रेसचे सरकार आल्यास कर्नाटकचे भवितव्य रिव्हर्स गियरने पाठिमागे जाईल. चुकूनही काँग्रेस आली तर आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार, तुष्टीकरण, परिवारवाद निर्माण होईळ. तसेच संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील. ही पिढी परिवर्तनाची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करू, असंही शाह म्हणाले होते.