no images were found
भारतातील सर्वात मोठा अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण
कोल्हापूर (प्रतिनिधी):भारतातील सर्वात मोठा अमेरिकन आठ वर्षाचा साडेपाच फुटाचा इग्वाना (सरडा,चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडा आकर्षण आहे. हे तीन सरडे प्रदर्शनात आणण्यात आला असून हे तीन सरडे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. पहिल्याच दिवशी सरडा पाहण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनात आलेला हिरवा सरडा चार महिन्याचा असून त्याची लांबी दोन फूट आहे चार वर्षानंतर तो चार फुटाचा आणि आठ वर्षानंतर तो सहा फुटाचा होतो. यात पाच महिन्याचा सरडा पाव किलो वजनाचा आहे.चार वर्षाचा सरडा चार फुटाचा ९ किलो वजनाचा आहे. तर आठ वर्षाचा सरडा पाच फुटाचा असून त्याचे वजन २२ किलो आहे. हे पूर्ण शाकाहारी असून भोपळा, कोथिंबीर, मेथीची भाजी, आणि अन्य भाजीपाला खातात. दिवसातून दोन वेळा सकाळी दहा वाजता आणि रात्री आठ वाजता त्यांना खाद्य पदार्थ द्यावे कोल्हापूर मधील किशोर वसंत चव्हाण सध्या मुंबईत राहत असून त्यांनी मुंबई येथे हे सरडे लहानपणापासून पाळले आहेत. या सरड्यांना मालकाची बोलीभाषा समजते हे सरडे विषारी नसून ते वर्षातून दोन वेळा ३५ अंडी घालतात. यांचे रक्त थंड असल्याने त्यांना उष्णतेची गरज असते.
अबब खास आकर्षण जनावरे
चंदगड येथील ७५ हजार रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण ७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, १४७० किलो वजनाचा ४ वर्षाचा गोलू मुरा रेडा,८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपूर जातीचा भैरु रेडा,राढीवडे राशीवडे बुद्रुक येथील काँकरेज वळू,नरेंद येथील २ वर्षे १ महिना २ दाती स्टूलवर उभा राहणारा मुरा रेडा