
no images were found
महाराष्ट्र दिनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती शाहू स्टेडियम, कोल्हापूर येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
तालुकास्तरीय मुख्य शासकीय समारंभ विधानसभा/ विधान परिषद सदस्य / तहसिलदार यांच्या हस्ते होणार आहे. समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडिल तसेच इतर नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
मुख्य शासकीय समारंभात नागरिकांना उपस्थित राहता यावे म्हणून सकाळी 7.15 ते 9 च्या दरम्यान कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. ज्यांना असा स्वतंत्र ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करावयाचा आहे, त्यांनी तो 1 मे रोजी सकाळी 7.15 पूर्वी किंवा 9 च्या नंतर करावा. दि. 1 मे रोजी ज्या ठिकाणी दरवर्षी राष्ट्रध्वज उभारला जातो, अशा सर्व शासकीय इमारतीवर, किल्यांवर, तसेच ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.