no images were found
पणजीत नाताळसाठी आलेल्या मुलीवर बसमध्ये चालकाने केला बलात्कार
पणजी : नाताळ साजरा करण्यासाठी वास्को येथून बसने पणजीत आलेल्या मुलीवर बस चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे. बसचालक संशयित चंद्रशेखर लमाणी (वय ३५) याला महिला पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
झुवारीनगर – वास्को येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक गट खासगी बसने (जीए ०६ टी ५३७६) पणजीत नाताळ साजरा करण्यासाठी आला होता. हे सर्व विद्यार्थी एका पार्टीला गेले. ज्यात मुलींचाही सहभाग होता. तेथे सर्वांनी मद्यप्राशन केल्याची चर्चा आहे. संध्याकाळी पीडित विद्यार्थिनीला अस्वस्थ वाटू लागल्याने ती एकटीच हॉटेलच्या खाली असलेल्या वास्कोहून आणलेल्या बसमध्ये झोपली.
काही वेळाने बस चालक चंद्रशेखरने या मुलीवर बसमध्ये बलात्कार केला. जर कुणाला सांगितलेस तर तुझीच बदनामी होईल, अशी धमकी लमाणी याने पीडित मुलीला दिली. त्यामुळे ती मुलगी गप्प राहिली. संशयित चालक बाहेर निघून गेल्यावर मैत्रिणीला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास बसचालका विरोेधात महिला पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली. पोलिस पथकाने चंद्रशेखरच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी सकाळी फॉरेन्सिक लॅबोरेटरीजच्या तज्ज्ञांनी बसमधील काही नमुने जमा केले आहेत.