Home क्राईम म्हैसूरमध्ये भीषण अपघातात PM मोदींच्या भावासह तिघे गंभीर जखमी

म्हैसूरमध्ये भीषण अपघातात PM मोदींच्या भावासह तिघे गंभीर जखमी

0 second read
0
0
180

no images were found

म्हैसूरमध्ये भीषण अपघातात PM मोदींच्या भावासह तिघे गंभीर जखमी

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला आहे. अपघातात प्रल्हाद मोदी यांच्यासोबत कारमध्ये मुलगा आणि सून हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रल्हाद मोदी यांच्यासोबत कारमध्ये मुलगा आणि सून प्रवास करत होते. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून, उपचारांसाठी त्यांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हैसूर जवळील कडकोल्ला परिसरात हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. प्रल्हाद मोदी हे गुजरात फेअर प्राइस शॉप्स अँड केरोसीन लायसन्स होल्डर असोसिएशनचे प्रमुख आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती कोल्हापूर : एसूस …