no images were found
शिवाजी विद्यापीठात ३१ डिसेंबरपासून ऑनलाईन रिसीट पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन
विद्यापीठातील सर्व अधिविभागप्रमुख, संचालक, समन्वयक, शिक्षक अधिकारी, प्रशासकीय सेवक, सर्व संलग्न महाविद्यालये, मान्यता प्राप्त संस्था, सर्व अधिविभागांतील विद्यार्थी व इतर यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, अधिकार मंडळांच्या ठरावानुसार शिवाजी विद्यापीठ परिसरामधील सर्व अधिविभागांद्वारे विद्यापीठाच्या जमास्वीकृती विभागात रोखीने, धनादेशाद्वारे तसेच बँक जमा पावतीद्वारे केल्या जाणाऱ्या पावत्या दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पासून बंद करण्यात येत आहेत. तसेच, दिनांक ३१ जानेवारी २०२३ पासून महाविद्यालये व इतर यांचेकरिता सदर सुविधा बंद करण्यात येणार आहे. सर्व संबंधितांनी Online Receipt Portal चा वापर करून सर्व पावत्या Online करावयाच्या आहेत. सदर सुविधा विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Quick Links मध्ये Online Receipt Portal वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.