
no images were found
सावधान ! भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार ?
मुंबई : भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या x bb आणि bf.7 या नवीन उप-प्रकारांची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत देशात XBB च्या 70 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे.
सिंगापूर, चीन आणि अमेरिकेत कोविडची प्रकरणे वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखील XBB स्ट्रेनबाबत अलर्ट जारी केला आहे. या प्रकारामुळे काही देशांमध्ये कोविडची नवीन लाट येऊ शकते.
भारतातील अनेक राज्यांमध्ये या प्रकाराचे संक्रमित रुग्णही समोर येत आहेत. ओडिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही एक्स बीबीची प्रकरणे समोर येत आहेत.
जीनोम सिक्वेन्सिंग देखील वाढविण्यात आले आहे. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की काही महिन्यांत, हा प्रकार ओमिक्रॉनच्या इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरू शकतो. हा धोका लक्षात घेऊन WHO ने सर्व देशांना व्हायरस ओळखण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि जीनोम टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला दिला आहे.