no images were found
आजपासून छटपूजा पर्व पारंपरिक उत्साहात सुरू
कोल्हापूर : कोरोनानंतर यंदा पारंपरिक उत्साहात छटपूजा हा सोहळा साजरा होणार आहे. सध्या जिल्ह्यात एक लाखाहून अधिक पूर्वोत्तर भारतीयांची संख्या असून, शहरात पंचगंगा घाटासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी हा सोहळा आजपासून साजरा होणार आहे.
येथील पूर्वोत्तर भारतीय समाजाच्या छटपूजा परंपरेला पंचवीस वर्षे पूर्ण झालेली आहेत. दरम्यान, आजपासून छटपूजेच्या व्रताला प्रारंभ झाला. त्याला ‘नहा-खाय’ असे म्हणतात. उद्या शनिवारी ‘खरना व्रत’ होणार असून, रविवारी सायंकाळी छटपूजेला प्रारंभ होऊन सूर्याला सायंकालीन अर्घ्य दिले जाईल. सोमवारी पहाटे चार ते सहा या वेळेत उगवतीच्या सूर्याला अर्घ्य देऊन सोहळ्याची सांगता होईल. मंगलमय हा सोहळा पाहण्यासाठी स्थानिक महिला मोठ्या प्रमाणावर नदी घाटावर गर्दी करतात.