Home राजकीय सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळल्याने अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार

सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळल्याने अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार

0 second read
0
0
79

no images were found

सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळल्याने अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्धची सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार आहेत. देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
त्यामुळे देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…