no images were found
भूवैज्ञानकीय सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे
कोल्हापूर : जिल्ह्यातील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, खाण मंत्रालय, भारत सरकार, यांच्याकडील भूभौतिकी विभाग, दक्षिण क्षेत्रीय कार्यालय हैद्राबाद यांच्यामार्फत राष्ट्रीय भूभौतिक मानचित्रण कार्यक्रमांतर्गत “Gound Gravity – Magnetic Survey” प्रकल्प सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ च्या कालवधीत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील क्षेत्रीय स्तरावर वरिष्ठ भूभौतिक शास्त्रज्ञ एस.के.भटाचार्य, वरिष्ठ भूभौतिक शास्त्रज्ञ निहारिका दास व भूभौतिक शास्त्रज्ञ शिखा जोश हे भूवैज्ञानकीय सर्वेक्षण करत असताना त्यांना सहकार्य करावे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे आशंकीत होण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन जिल्हा खणीकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे.
या प्रकल्पाचे क्षेत्रीय स्तरावर कामकाज करताना भूभौतिक शास्त्रज्ञ हे देशाच्या शाश्वत विकासासाठी खनिजांचे अन्वेषण करणे, भुवैज्ञानकीय माहिती गोळा करणे तसेच त्याची माहिती लोकांना देणे अशा प्रकारच्या कामांचा समावेश प्रकल्पात आहे.