
no images were found
या सरकारचे अंत्यसंस्कार थाटामाटातच करणार :- खासदार संजय राऊत
औरंगाबाद :- आम्ही या सरकारचे थाटामाटत अंत्यसंस्कार करणार आहोत, असा इशाराच खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामच्या बॅनर्सवर या संग्रामातील नेत्यांचा फोटो नाही. त्यावरूनही संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. स्वामी रामानंद तिर्थ, गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण आदी नेते या संग्रामात होते. त्यांचेच फोटो नाहीत. मग हे नेते स्वातंत्र्य संग्रामात नव्हते तर काय मोदी, शाह आणि रावसाहेब दानवे संग्रामात होते का? असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला.
मराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने उद्या औरंगाबाद येथे कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीची राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ उद्या औरंगाबादेत येणार आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. हे सरकार थाटामाटातच मरणार आहे. या सरकारचे अंत्यसंस्कार थाटामाटातच करणार आहोत. तीन तासासाठी संपूर्ण प्रशासन वेठीस धरता. इथे दुष्काळ आहे. प्यायला पाणी नाहीये. अनेक प्रश्न आहेत. त्यावर हा संपूर्ण खर्च करा. उगाच वायफळ खर्च कशाला करता? आमचं लक्ष बैठकीकडे आहे. बैठकीनंतरच्या पोपटपंचीकडे जास्त आहे, असं संजय राऊत म्हणाले.