no images were found
हिंदी भाषेला वैश्विक भाषेचे महत्व : डॉ.अशोक कुमार मंगलेश
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : हिंदी भाषा ही संवाद, रोजगार आणि कौशल्याची भाषा आहे. जगभरात 300 करोड पेक्षा जास्त लोक रोज हिंदीतून व्यवहार करत आहेत.त्यामुळे हिंदी भाषेला वैश्विक भाषेचे महत्व होत असल्याचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील हिंदी अनुवाद साहित्य परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ.अशोक कुमार मंगलेश यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र अंतर्गत हिंदी विभाग आणि प्लेसमेंट सेल यांच्यामार्फत हिंदी दिनाचे औचित्य साधून "हिंदीचे महत्त आणि रोजगाराच्या संधी" या विषयावरती ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे उपस्थित होते.
डॉ.मंगलेश म्हणाले की, हिंदी भाषा ही वैज्ञानिक कला आहे. ती विचारधारा,संस्कृती आणि इतर भाषांना एकत्र जोडणारी भाषा आहे.मारिशस, कॅनडा, नेपाळ, जर्मनी, अमेरिकन, बाली व इंडोनेशिया या ठिकाणी हिंदीतून व्यवहाराची भाषा म्हणून उपयोगात आणली जात आहे. हिंदी भाषेच्या शिक्षणाने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. सिनेमा क्षेत्र, विज्ञान क्षेत्र, दूरदर्शन,जाहिराती क्षेत्र, विमा क्षेत्र, रेल्वे क्षेत्र, हिंदी भाषा अधिकारी, बातमीदार, चांगला वक्ता, फिल्म लेखक, बँक अधिकारी, रेडिओ जॉकी, नाटक अनुवाद क्षेत्र यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
हिंदी ही भाषा जागतिक भाषा म्हणून आजमितीला जगभर पुढे येत आहे. मनोरंजन, बहुराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्या,शिक्षण,ज्ञान – विज्ञान,विचार ,प्रसारमाध्यमे यांची भाषा राजकारणी लोकांची भाषा हिंदी आहे.सिनेमा आणि संगणक यांची ही भाषा हिंदी आहे.त्यामुळे हिंदी भाषेचा विस्तार होत आहे.केंद्रीय संस्थान,आग्रा व हिंदी निदेशानालाय, नई दिल्ली या संस्था मध्ये जागतिक विध्यार्थ्यांचा हिंदी शिकण्याकडे कल वाढतो आहे.त्यामुळे हिंदी भाषेची लोकप्रियता वाढते आहे.असे डॉ.मंगलेश यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक सहा.प्राध्यापक श्री. वैभव पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्याची ओळख सहा.प्राध्यापक डॉ.एस.वाय.चोपडे यांनी केली. सूत्रसंचालन. डॉ. चांगदेव बंडगर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहा.प्राध्यापक डॉ.नितीन रणदिवे यांनी केले.