no images were found
भगवान महावीर अध्यासनास श्रीमती मंगल चौगुले यांच्याकडून १५०००० रूपये बृहत दान
शाहूपूरी कोल्हापूर मधील श्रीमती मंगल श्रीपाल चौगुले या दानशुर महिलेने भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित भव्य वास्तूकरीता रू १५००००/- चे बृहत दान दिले. मा. कुलगुरूना रूपये १५०००० चा धनादेश दि. १३ सप्टेंबर रोजी सुपूर्द केला. या प्रसंगी मा कुलगुरू यांनी प्रस्तावित इमारत बांधकामास लवकरच शुभारंभ करण्याच्या दृष्टीने सर्व जैन व अहिंसा प्रेमी व्यक्ती व संस्थाना आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. बी. डी. खणे, प्राध्यापिका श्रीमती मनिषा काडाप्पा, श्रीमती मंगला लिंबेकर उपस्थ्ति होते. श्रीमती मंगल चौगुले यांचा सत्कार मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शाल व विद्यापीठ बोधचिन्ह आणि ग्रंथ देऊन केला.याप्रसंगी त्यांचे अभिनंदन मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील तसेच मा. कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विजय ककडे यांनी केले
भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस 100 % पात्र आहे. सदर देणगी ऑनलाईन व स्कॅन कोड ने देणेची सुविधा उपलब्ध आहे. तरी देणगी द्यावयाची असल्यास डॉ.विजय ककडे 9422423941 यांच्याशी संपर्क साधावा