Home धार्मिक बौद्धिक संपत्ती, तात्विक दृष्टी आणि भिन्न जाती, वर्णांच्या एकजूटीमुळेच हिंदू धर्म महान : श्री.राजेश क्षीरसागर

बौद्धिक संपत्ती, तात्विक दृष्टी आणि भिन्न जाती, वर्णांच्या एकजूटीमुळेच हिंदू धर्म महान : श्री.राजेश क्षीरसागर

9 second read
0
0
75

no images were found

बौद्धिक संपत्ती, तात्विक दृष्टी आणि भिन्न जाती, वर्णांच्या एकजूटीमुळेच हिंदू धर्म महान : श्री.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी ): हिंदू संस्कृती ही एक पुरातन संस्कृती आहे. जगातली जी सर्वात जुनी संस्कृती आहे. हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील हा सर्वात मोठा व महत्त्वाचा धर्म असून, आजही अनेक जाती, वर्ण आदि सर्व रूपे या धर्मात एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. हिंदू धर्माचे जगभरात साधारणपणे १ अब्ज हिंदू अनुयायी आहेत. हिंदुत्व हा शाश्वत धर्म आहे. हा धर्म हजारो वर्षे टिकला याच प्रमुख कारण म्हणजे या धर्माकडे खूप मोठी बौद्धिक संपत्ती, तात्विक दृष्टी आणि भिन्न जाती, वर्णाची एकजूट आहे. हिंदुत्व एकेश्वरवादी नाही, त्याची अनिवार्य अशी संहिता नाही. येथे ठराविक प्रार्थनाच सक्तीची नाही. सर्वांना सामावून घेणारा आणि देशाभिमान निर्माण करणारा असा हिंदू धर्म महान असून, या धर्माचे आपण अनुयायी असल्याचा अभिमान आहे. हिंदू संकृतीच्या जपणुकीसाठी जातीभेद बाजूला ठेवून सर्व हिंदू धर्मियांनी श्रावण व्रतवैकल्य सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र यावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी नष्टे लॉन, कोल्हापूर येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
        या श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रमाकरिता जेष्ठ हिंदुत्ववादी आणि शिवसैनिक कमलाकर किलकिले सकाळी कावडीने पंचगंगा नदी तीरावरून कावडीने पाणी आणले. या पाण्याचे कार्यक्रमस्थळी सवाद्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात कमलाकर किलकिले यांनी पवित्र पंचगंगा नदी तीरावरून आणलेल्या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेकाने झाली. यानंतर गोमाता पूजन आणि ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत महायज्ञास सुरवात करण्यात आली. याकरिता हिंदू धर्मातील अनेक जातीपंतातील मान्यवर यजमान उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदू देवतांचे पूजन आणि आरती करण्यात आली. यासह भारत देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र वर्षानिमित्त भारतमातेची आरती करण्यात आली. त्याचबरोबर ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी “वंदे मातरम्”, “भारत माता कि जय” अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमावेळी एकाचवेळी १०८ जोडपी केळीच्या पानांवर मंत्र घोषात सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडला. यानंतर या कार्यक्रमाचा सुमारे पाच हजार हिंदू जणांनी लाभ घेतला. यावेळी एस्कोन भजनी मंडळाचा जप आणि भजनानी उपस्थित हिंदूजणांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर भोजन मंडपामध्ये हिंदू धर्माचे मार्गदर्शनपर बोधावाक्यांचे फलक लावणेत आले होते.
       यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, हिंदू धर्मातील सणांची महती सर्वाना व्हावी, हिंदू धर्माचे जागरण व संघटन व्हावे, याकरिता आठ वर्षांपूर्वी समस्त हिंदू धर्म संघटनाच्या वतीने श्रावण व्रत- वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाची सुरवात झाली. हिंदू सणांवरील निर्बंध शासनाने उठविल्याबद्दल समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे आणि उप-मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांचे आभार. हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरवात करण्यात होती. या उपक्रमास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचे अनुकरण राज्यभरात होऊ लागल्याने या उपक्रमाची सुरवात कोल्हापुरातून केली याचा आनंद होत आहे. या उपक्रमाचे स्वरूप या पेक्षाही मोठे होऊन संपूर्ण देशभरात श्रावण व्रत वैकल्य उपक्रम व्हावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       या कार्यक्रमामध्ये महादेवजी यादव महाराज, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.सुजित चव्हाण, जेष्ठ हिंदुत्ववादी बाबा वाघापूरकर, देवस्थान समिती माजी कोषध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, युवासेना लोकसभा अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, सौ. दिशा क्षीरसागर, अॅड.सुधीर जोशी वंदूरकर, श्रीकांत पोतनीस, चंद्रकांत बराले, संभाजी उर्फ बंडा साळुंखे, मधुकर नाझरे, उदय भोसले, शिवाजी जाधव, किशोर घाटगे, कमलाकर किलकिले, रणजित जाधव, राहूल चव्हाण, शिवानंद स्वामी, गजानन तोडकर, दीपक देसाई, नंदू घोरपडे, मनोहर सोरप, अशोक देसाई, पराग फडणीस, पाटील, अॅड.देवेंद्र रासकर, अशोक रामचंदानी, संदीप सासणे, शामराव जोशी, शिवसेना महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, पूजा कामते, अमरजा पाटील, नम्रता भोसले, गौरी माळतकर, सुनीता भोपळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …