
no images were found
‘शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला’, पुस्तकावर बंदीची परशुराम सेवा संघाची मागणी
पुणे : ‘शिवरायांच्या स्वराज्याच्या अंत पेशवा ब्राह्मणांनी केला’, या पुस्तकाचं प्रकाशन पुणे येथे होणार आहे. १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीचं औचित्य साधून हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. महाराष्ट्रात आता आणखी एका पुस्तकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवरायांच्या स्वराज्याच्या अंत पेशवा ब्राह्मणांनी केला’ हे पुस्तक विलास खरात यांनी लिहिलेलं ‘ ते जातीय द्वेष निर्माण करणारं असल्याचा आरोप परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. ते म्हणाले की, पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.दरम्यान या प्रकाशनावर बंदी घातली गेली पाहिजे. खोटा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून छापला जाणे चुकीचे आहे. पेशवे ब्राह्मण म्हणून हे केलं जात आहे. पेशवे हे कधीही ऱाजे झाले नाही. राजे हे भोसले घराणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं भोसले घराणं आमचं दैवत असल्याचंही देशपांडे यांनी म्हटलं आहे.