no images were found
दोन पिढ्यांमधील प्रेम, डेटिंग व नात्याची असमकालीन कथा ‘मॅन वुमन मॅन वुमन’
नसीरूद्दीन शाह यांचे लेखन व दिग्दर्शन असलेला हा चित्रपट अनेक ट्विस्ट्स व रोमांच सादर करतो, जे ‘प्रेम सर्वांवर विजय मिळवते’ या लोकप्रिय भावनेला जागृत करतात
रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने मोटली मूव्हीज अॅण्ड ट्रिगर प्रॉडक्शन्ससोबत सहयोगाने आज त्यांचा नवीन लघुपट ‘मॅन वुमन मॅन वुमन’च्या रीलीजची घोषणा केली. दिग्गज अभिनेते व चित्रपट निर्माते नसीरूद्दीन शाह यांचे लेखन व दिग्दर्शन असलेला हा २६ मिनिटांचा चित्रपट दोन पिढ्यांमधील प्रेम व सहवासाच्या अद्वितीय कथेला सादर करतो. रत्ना पाठक शाह, तरूण धनराजगीर, साबा आझाद आणि विवान शाह अभिनीत हा चित्रपट आधुनिक युगातील नात्यांमधील गुंतागूंतींना सुरेखरित्या दाखवतो.
समकालीन काळामध्ये स्थित चित्रपट ‘मॅन वुमन मॅन वुमन’ हलक्या-फुलक्या पद्धतीने गुंतागूंतीचे कथानक सादर करतो. या चित्रपटामध्ये दोन जोडप्यांच्या डेटिंग जीवनाला दाखवण्यात आले आहे, ज्यांच्यामध्ये अनेक साम्य आहेत, पण शेवटी ते एकमेकांमध्ये गुंतून जातात. त्यांची कथा पुढे सरकते तसे चित्रपट अतूट प्रेम, रोमँटिक व कौटुंबिक सार सादर करतो, जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. शेवटी, अनेक मजेदार घटनांनंतर चित्रपट महत्वाचा संदेश देतो, जो ऐकण्यात आलेला असला तरी असाधारण आहे, तो संदेश म्हणजे ‘प्रेम सर्वांवर विजय मिळवते’.
या चित्रपटाबाबत लेखक-दिग्दर्शक नसीरूद्दीन शाहम्हणाले, ”मला रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्ससोबत सहयोगाने माझा लघुपट रिलीज करण्याचा आनंद होत आहे. ‘मॅन वुमन मॅन वुमन’ बिनशर्त प्रेमाची कथा आहे. प्रेम मार्गदर्शक असल्यास नाते किती गुंतागूंतीचे होऊ शकते, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी आशा करतो की, प्रेक्षक हा चित्रपट पाहून प्रेरित होतील.”