no images were found
महाविकास आघाडीत बिघाडीची दाट शक्यता–हेमंत पाटील
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत आता बिघाडीची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शरद पवारांचा गटाबद्दल जनमानसात असलेली भावनिक लाट देखील ओसरील असल्याने त्यांचे नेतृत्व कितीप्रमाणात निवडणुकीत चमत्कार घडवणार यांची चर्चा सध्या सुरू आहे,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केले.
पवारांबद्दल महाविकास आघाडीत असलेली अंतर्गत कुजबुज, राज्यातील कॉंग्रेस नेतृत्व आणि यांच्याकडून भ्रमनिरास झालेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वहिनतेमुळे महाविकास आघाडीत धुसफुस सुरू आहे.विरोधकांच्या वज्रमुठ बाबद त्यामुळे संशयाचे वातावरण आहे,असा दावा देखील पाटील यांनी केला. याउलट भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेवून स्थापन केलेल्या युती सरकारबद्दल जनतेच्या मनातील विश्वास दृढावला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात आली आहे.
सीमांत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम-किसानच्या धर्तीवर योजना आखून त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जात आहे.यासारख्या विविध योजनांमुळे युती सरकारने जनमानसाच्या मनात घर केले आहे,असे पाटील म्हणाले.शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना,फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वात एनसीपी येणाऱ्या काळात होवू घातलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करेल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.