
no images were found
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा भीषण अपघात
लोणावळा: पुणे – मुंबई एक्स्प्रेस हायवेवर पुण्याकडून मुंबईकडे जाताना पुन्हा अपघात झाला. कंटेनर हा मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी ९ च्या सुमारास एम एच ४६ ए आर ०१८१ हा कंटेनर पुण्याकडून मुंबईकडे जात होता. हा कंटेनर मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाला. या अपघातात पाच चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यात कारमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत तर १ महिला आणि चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे येथील दाखल करण्यात आले आहे.
हा कंटेनर उलटल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आता पोलिस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पाऊस सुरू असल्याने वाहने सावकाश चालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.