no images were found
जुन्या वृत्तपत्रापासून बनवलेल्या १२०० पिशव्यांचे विद्यार्थ्याच्या कडून दुकानदारांना वितरण
कसबा बावडा/ (प्रतिनिधी )
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजीनिअरिंग विभागाच्या ‘वेस्ट टू बेस्ट ’ स्टुडट क्लबच्यावतीने १८ मार्च रोजी जुन्या वृत्तपत्रापासून पेपर बग तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यानी १२०० हून अधिक कागदी पिशवयाची निर्मिती केली. महाविद्यालय परिसरातील दुकानदाराना या पिशव्या वितरीत करून विद्यार्थ्यानी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा आणि कागदी पिशव्यांचा वापर करा असा संदेश दिला.
अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजीनिअरिंग विभागाच्या ‘वेस्ट टू बेस्ट ’ स्टुडट क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत ११२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना जुन्या वृत्तपत्रापासून पिशव्या कशा तयार कराव्यात याबाबत प्रा. योगेश चौगुले यांनी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठी अतिशय घातक असून त्यांचे पूर्ण विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात. या उलट कागदी पिशव्या सहजपणे विघटीत होतात, त्यामुळे कागदी पिशव्याचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचे मॅकेनिकल इंजीनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. सुनील रायकर यानी सांगितले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना जुन्या वृत्तपत्रापासून १२०० हून अधिक पिशव्याची निर्मिती केली. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातील व्यावसायिक, छोटे दुकानदार यांना या पिशव्यांचे विद्यार्थ्याकडून वितरण करण्यात आले. व्यावसायिकांनीही घातक प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी पिशव्याचा वापर करून पर्यावरण रक्षणास हातभार लावावा असे आवाहन विद्यार्थ्यानी यावेळी केले.
मॅकेनिकल इंजीनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. सुनील रायकर यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी समन्वयक योगेश चौगुले, दीपक सावंत, विराज पसारे, उत्कर्ष पाटील यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.