no images were found
रशियाने चंद्राकडे पाठविलेले ‘लुना-२५’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले
वृत्तसंस्था, बंगळुरू : रशियाने तब्बल पाच दशकांनी चंद्राकडे पाठविलेले ‘लुना-२५’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. मानवरहित ‘रोबो लँडर’ कक्षेत अनियंत्रित झाल्यानंतर कोसळल्याचे अवकाश संस्थेने जाहीर केले. दुसरीकडे भारताचे ‘चंद्रयान-३’ प्रकल्पातील ‘लँडर’ त्याच्या अवतरणपूर्व कक्षेत पोहोचले असून २३ तारखेला संध्याकाळी ६.०४ वाजता ‘विक्रम’चे लँडिंग होईल.