no images were found
ईडीच्या दबावामुळे काही सहकारी भाजपसोबत गेले-शरद पवार
अजित पवार यांचा एक मोठ गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीमध्ये पडले आहेत. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीवर शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. पक्ष फुटीवर शरद पवार यांनी प्रथमच कारण देत खुलासा केला आहे.
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीवर शरद पवारांनी खळबळजनक दावा केला आहे. ईडीच्या दबावामुळे काही सहका-यांनी पक्षांतर केलं आणि ते भाजपसोबत गेले असा हल्लाबोल पवारांनी केला आहे. अजित पवार गटावर पहिल्यांदाच शरद पवारांनी जाहीरपणे ही टीका केली आहे.