Home क्राईम जिल्ह्यात 20 सप्टेंबर पर्यंत बंदी आदेश लागू

जिल्ह्यात 20 सप्टेंबर पर्यंत बंदी आदेश लागू

6 second read
0
0
117

no images were found

जिल्ह्यात 20 सप्टेंबर पर्यंत बंदी आदेश लागू

 

कोल्हापूर : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने, निषेध, मोर्चा, गाव बंद, रॅली इ.प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात मोठया प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ. साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष/संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन,उपोषण,मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 20 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

        हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित  उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…