no images were found
महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था रक्कमेच्या वसुलीसाठी स्थावर संपत्तीचा 26 सप्टेंबरला लिलाव
कोल्हापूर : महाराष्ट् नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर यांच्याकडून एकूण 1 लाख 42 हजार रुपये अधिक व्याजाच्या रक्कमेची वसुली करण्यासाठी क करवीर सि.स.नं. 1055 ब, ए वॉर्ड पैकी महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर व इतर यांच्या हिस्सेची स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली असल्याचे करवीरच्या तहसिदारांनी कळविले आहे.
विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्ववत एकूण 1 लाख 42 हजार रुपये अधिक व्याज भरले नाही तर नमुद मालमत्ता तहसिलदार करवीर येथे दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जाहिर लिलावाने विकली जाणार आहे.
लिलावाच्या शर्ती याप्रमाणे- का करवीर रि. स. नं. 1055 ब पैकी महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था, ता.करवीर जि. कोल्हापूर यांच्या हिस्सेचे क्षेत्र 0.20.00 चौ.मी. या मालमत्तेचे मुल्यांकन किंमत रुपये 10 लाख 72 हजार 600 इतके असून यापेक्षा कमी बोली स्वीकारली जाणार नाही. लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने ¼ रक्कम तात्काळ भरणे आवश्यक आहे. लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलाव धारक यांना समज दिल्यापासून तीन दिवसात उर्वरित ¾ रक्कम जमा करणे आवश्यक आहे. या अटीची पूर्तता न केल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी असल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या ¼ रक्कमेतून वजा केली जाईल.थकबाकीदाराने लिलाव पुकारल्यानंतर 30 दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी, नोटीस फि, लिलाव पुकारल्याचा खर्च इत्यादी जमा करुन लिलाव रद्द करण्यास सक्षम अधिकाऱ्याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याचे नाव मंजुरी अंतरावर पूर्ण केला आहे. त्यास बोली रक्कमेच्या 5 टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल. सक्षक अधिकाऱ्याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल त्या आधारे लिलाव धारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा दिला जाईल.