Home सामाजिक आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफकडून महिलांसाठी 15% आजीवन  सवलत 

आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफकडून महिलांसाठी 15% आजीवन  सवलत 

4 min read
0
0
31

no images were found

आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफकडून महिलांसाठी 15% आजीवन 

सवलत 

 

 

 मुंबईआयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या आयप्रोटेक्ट स्मार्ट या टर्म इन्शुरन्स प्लॅनवर केवळ महिलांसाठी भरल्या जाणाऱ्या सर्व प्रीमियम्सवर 15% ची आजीवन सवलत आज जाहीर केलीयाव्यतिरिक्तनोकरदार महिलांना पहिल्याच प्रीमियमवर अतिरिक्त 15% ची सूट मिळेलयामुळे त्यांना स्वत:ला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे सोपे होईल.

 गंभीर आजारातील उपचारांमध्ये मदत मिळण्यासह आयप्रोटेक्टस्मार्ट ब्रेस्टअंडाशयगर्भाशय आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोग अशा आजारांसह 34 गंभीर आजारांपासून संरक्षण देतेयात आरोग्य आणि जीवन विमा या दोन्हीचा समावेश आहेमहत्त्वाचे म्हणजेनिदानानंतर आरोग्य विम्याची रक्कम दिली जातेविशेष म्हणजेकुटुंबाच्या बचतीला बाधा  आणता तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत केली जाते.

  लॅन्सेटच्या अंदाजानुसार,50वर्षांखालील महिलांमध्ये कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण जास्त आहेशहरी भागात केवळ एकदा रुग्णालयात नेऊन उपचार करण्यासाठी जवळपास लाखभराचा खर्च येऊ शकतोत्यामुळे वेळ आलीच तर अशा गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी महिलांकडे आर्थिक उपायांच्या  उपलब्धतेचे नियोजन असणे आवश्यक आहे.

 या घोषणेबाबत भाष्य करतानाआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य वितरण अधिकारी श्रीअमित पल्टा म्हणाले,“कुटुंबाच्या भल्यासाठी महिला करत असलेला त्याग आणि घेत असलेली काळजी याचे आम्हाला कौतुक आहेमहिलांमधील याच सेवाभावी वृत्तीचा आदर करण्यासाठी आम्ही आमच्या सर्वात लोकप्रिय टर्म इन्शुरन्स उत्पादन आयप्रोटेक्ट स्मार्ट साठी भरल्या जाणाऱ्या सर्व प्रीमियमवर 15% ची आजीवन सवलत दिली आहेया माध्यमातून महिलांसाठी काही केल्याचा आम्हाला अभिमान आहेनोकरी करणाऱ्या स्त्रिया घरातील अर्थव्यवस्थेत समान योगदान देतातत्या ‘संरक्षक‘ तर असतातच पण आता त्या घरखर्चातही बरोबरीचा वाटा उचलताना दिसतातत्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून आम्ही नोकरदार महिलांना पहिल्या प्रीमियमसाठी 15% ची अतिरिक्त सूट देत आहोत.”

 ते पुढे म्हणाले,“आमच्या सातत्यपूर्ण व्यवसाय वाढीमुळे आम्ही महिलांमध्ये संरक्षण आणि दीर्घकालीन बचत योजना या दोन्हींसाठी गेल्या काही वर्षांमध्ये वाढती आवड आणि जागरूकता पाहिली आहेदेशाच्या प्रगतीमध्ये कार्यरत महिलांचे प्रमाण सतत वाढते आहेत्यामुळे त्यांना स्वतःला आणि त्यांच्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी करण्यासाठी जीवन विम्याची आवश्यकता निश्चितच असणार आहे.‘योग्य ग्राहकासाठी योग्य उत्पादन’ यावर आमचा विश्वास आहेआणि यामुळेच महिलांविषयक विमा पर्यायात वेगाने वाढ पाहायला मिळेलआयप्रोटेक्ट स्मार्ट त्यांना त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक बचत योजनेला रिंगफेन्स करण्यास सक्षम करेलयावर आमचा विश्वास आहेकारण एखादी अप्रिय घटना घडल्यास ते कुटुंबासाठी उत्पन्न म्हणून काम करू शकते.

 त्यांनी पुढे सांगितले की,“केवळ महिलांसाठी आणण्यात आलेली ही परवडणारी आणि आकर्षक ऑफर आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहेकेवळ 1.27 दिवसांच्या सरासरी क्लेम सेटलमेंटमुळे एफ वाय 2024 साठी 99.17% एवढा क्लेम सेटलमेंट रेशो दिसला.”

 आयप्रोटेक्ट स्मार्ट आयुष्यातील अनिश्चिततेपासून आर्थिक संरक्षण प्रदान देतेयात मृत्यूआजार तसेच अपंगत्व यांचा समावेश आहे आणि तेही परवडणाऱ्या प्रीमियममध्येयात 99 वर्षांपर्यंत कव्हर मिळतेउदाहरणार्थएक 30 वर्षांची नोकरदार महिला 1 कोटी रुपयांच्या लाइफ कव्हरसाठी 30 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसह फक्त 546 रु.चा मासिक सवलत प्रीमियम भरून उत्पादन खरेदी करू शकतेया ऑफरचा लाभ घेऊन महिला 30 वर्षांच्या प्रीमियम भरण्याच्या कालावधीत 34,920 रुपयांची बचत करू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …