no images were found
एचक्यू मास्टरपीस आणि एचक्यू इव्हॉल्व्हचे आगमन : जर्नलिंगमध्ये निखळ आणि उपयुक्ततेच्या नव्या युगाचा आरंभ
नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या एचक्यू या ब्रँडतर्फे एचक्यू मास्टरपीस आणि एचक्यू इव्हॉल्व्ह जर्नल्स ही दोन उत्पादने सादर करण्यात आली आहेत. जर्नल्सच्या क्षेत्रात या दोन वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांनी एक नवे प्रारुप स्थापित केले आहे. तुमच्या लेखनाचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी यात कलात्मक डिझाइन्स आणि उत्कृष्ट उपयुक्तता यांची सांगड घालण्यात आली आहे.
एचक्यू मास्टरपीस : कला आणि शब्दांचा संगम
एचक्यू मास्टर हे केवळ एक जर्नल नाही तर ही एक कलाकृती आहे. अस्सल कॅनव्हास कव्हरवर कल्पक डिझाइनने सजावट करण्यात आलेले या A5 आकाराच्या जर्नलने रोजच्या लिखाणाला शुद्धतेचा आणि रुबाबदारपणाचा स्पर्श लाभतो. 80GSM नैसर्गिक छटा असलेला हा कागद कलात्मक कव्हरला पूरक ठरतो आणि तुमचे पेन त्या पानांवरून अगदी सहजपणे उमटत जाते.
कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह्ज, मॅनेजर, व्यावसायिक, कल्पक वृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी एचक्यू मास्टरपीसमधील आतल्या पानांवर राखाडी रंगाच्या ओळी आहेत. त्यामुळे लिहिणाऱ्याला एक प्रकारे आरामदायीपणाचा अनुभव मिळतो. सहज हाताशी असलेल्या बुकमार्कमुळे तुम्ही तुमच्य महत्त्वाच्या नोट्सवर खूण करून ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या विचारांची मालिका खंडित होणार नाही.
या जर्नलची शिवणही भक्कम (केस बाइंडिंग) आहे. त्यामुळे, हे जर्नल तुम्ही किती वेळा वापरले तरी जर्नलची पाने व्यवस्थित राहतात. एचक्यू मास्टरपीसमुळे तुम्ही तुमच्या कल्पकतेचा वारू कोणत्याही अडथळ्याशिवाय बेफाम दौडवू शकता.
एचक्यू इव्हॉल्व्ह : जर्नलिंगमधील उत्क्रांतीला कवेत घ्या
एचक्यू इव्हॉल्व्हमध्ये नावीन्यतेची कास धरत जर्नल डिझाइनची पारंपरिक चाकोरी भेदली आहे. वैशिष्ट्यपूर्ण रबरचे आवरण असलेल्या कॉर्कपासून तयार केलेल हे अत्यंत निमुळते A5 आकारातील जर्नल दिसायला एकदम आकर्षक आहे. तीन मोहक कव्हर डिझाइन्सनी तुमच्या लेखनसंग्रहाला अभिजाततेचा स्पर्श लाभेल.
एचक्यू मास्टरपीसप्रमाणेच एचक्यू इव्हॉल्व्हमध्येही 80GMS नैसर्गिक छटा असलेला कागद आणि राखाडी रंगाच्या ओळी आहेत. त्यामुळे आल्हाददायक लेखनानुभव मिळतो. चोखंदळ मॅनेजर्स आणि सीएक्सओंसाठी हे जर्नल एक आदर्श साधन आहे. दीर्घकालीन वापरासाठी आणि भेट म्हणून देण्यासाठी एचक्यू इव्हॉल्व्ह सुयोग्य आहे. एचक्यू इव्हॉल्व्ह हे शाश्वत आणि शैलीदार जर्नल्सचे प्रतिनिधित्व करते.
“आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी एचक्यू मास्टरपीस आणि एचक्यू इव्हॉल्व्ह सादर करताना आम्ही अत्यंत आनंदित आहोत.”, असे नवनीतच्या डोमेस्टिक स्टेशनरी बिझनेसचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले. “या नव्या उत्पादनांच्या माध्यमातून असीम कल्पकतेला वाव देण्याचे आणि अतुलनीय लेखनानुभव देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तुम्ही प्रस्थापित प्रोफशनल असा वा उदयोन्मुख कलाकार, तुमच्या आत्मशोधासाठी आणि अभिव्यक्तीसाठी एचक्यू मास्टरपीस आणि एचक्यू इव्हॉल्व्ह हा तुमचा सुयोग्य साथी असेल.”