Home शासकीय स्वातंत्र दिनानिमित शिवसेनेच्या वतीने कसबा बावडा परिसरात भारत मातेची शोभा यात्रा

स्वातंत्र दिनानिमित शिवसेनेच्या वतीने कसबा बावडा परिसरात भारत मातेची शोभा यात्रा

0 second read
0
0
36

no images were found

स्वातंत्र दिनानिमित शिवसेनेच्या वतीने कसबा बावडा परिसरात भारत मातेची शोभा यात्रा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा आणि शिवसेनेचं, माझं नात जिव्हाळ्याच आहे. कसबा बावडा नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. पूरस्थिती आणि कोरोना काळात कसबा बावडा वासीयांच्या सोबत राहिलो हे मी माझं कर्तव्य मानतो. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष कसबा बावडा वासीयांच्या सोबत जल्लोषात साजरे करण्याचे नियोजन केले. यास बावडा वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजाराम बंधारा पुलास निधी, पाणंदी विकास, रस्ते विकास या माध्यमातून कसबा बावड्यातील विकास कामे केली आहेत. कसबा बावडा परिसराचा विकास व्हावा हे ध्येय जोपासले आहे. कसबा बावड्यातील युवा खेळाडूंसाठी रु.७५ लाखांचे लाखांचे मल्टीपर्पज ग्राउंड उभारण्यास निधी मंजूर झाला असून, लवकरच कामास सुरवात करण्यात येणार आहे. भगवा चौक कसबा बावड्यातील नागरीकांचा अभिमान असून, या चौकाचे वर्षभरात सुशोभिकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बसविणार, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.

देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कसबा बावडा परिसरातील विद्युत खांबावर तिरंगा कलरची कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली. स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने कसबा बावडा परिसरात भारत मातेची भव्य शोभा यात्रा जल्लोषात पार पडली. भगवा चौक येथून शोभा यात्रेस सुरवात झाली. यात्रेकरिता सजवलेल्या ट्रॅक्टरवर भारत मातेची प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. मेन रोड मार्गे पिंजार गल्ली येथून पुन्हा भगवा चौक येथे यात्रा समाप्त करण्यात आली. हातात तिरंगा झेंडा घेवून शोभा यात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी “वंदेमातरम्”, “भारत माता कि जय” अशा घोषणांनी कसबा बावडा परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, देशप्रेम कस असाव हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. देशाचा विकास कसा करावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिल. ३७० कलम, अयोध्येतील श्री राम मंदिर असे जिव्हाळ्याचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीनी मार्गी लावले. देशाला जागतिक महासत्ता बनविण्याचे त्यांचे स्वप्न असून, नीती आयोगाच्या माध्यमातून देशाची आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून राज्याचा जीडीपी वाढविण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या उत्पन्न वाढीतून देशाचे उत्पन्न वाढविण्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे देशाच्या १०० व्या स्वातंत्र दिनी देश जागतिक महासत्ता असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, दिलीप उलपे, रुपेश पाटील, मा.नगरसेवक प्रदीप उलपे, अमर साठे, चंद्रकांत घाटगे, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, रोहन उलपे, धवल मोहिते, सुरज सुतार, आदर्श जाधव, कृष्णा लोंढे, कपिल पोवार, सचिन पाटील, राकेश चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी, कसबा बावडा परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…