Home शैक्षणिक डी. वाय. पाटील विद्यापीठ, अभियांत्रिकीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

डी. वाय. पाटील विद्यापीठ, अभियांत्रिकीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

0 second read
0
0
38

no images were found

डी. वाय. पाटील विद्यापीठ, अभियांत्रिकीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कसबा बावडा/वार्ताहर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये 77 वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यगीते सादर केली. तसेच एनसीसी पथकाच्या परेडने उपस्थितांची मने जिंकली. या समारंभाला कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, संग्राम घोरपडे, सीएचआरओ श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, प्राचार्य डॉ चंद्रप्रभू जंगमे, अमृत कुवर रायजादे, जान्हवी शिंदे, रुधिर बारदेस्कर, उपकुलसचिव संजय जाधव, सुरेश खोपडे, कृष्णात निर्मळ, अजित पाटील, डॉ शंकर गोणुगडे यांच्यासह विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, फिजीओथेरपी कॉलेज, कॉलेज ऑफ हॉस्पिटलिटीचे प्राचार्य, प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अभियांत्रिकी महाविद्यालय
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महविद्यालय येथे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, संग्राम घोरपडे, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, तळसंदे विद्यापीठ कुलगुरू डॉ. के. प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, डॉ एल व्ही मालदे, यांच्यासह अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी एनसीसी विभागाच्या वतीने अंध शाळेसाठी अल्युमिनियमची शिडी व जिलेबी वाटप करण्यात आले. यावेळी जिमखाना प्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, डॉ राहुल महाजन आदी उपस्थित होते.

हॉटेल सयाजी
हॉटेल सयाजी येथे पृथ्वीराज पाटील, यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी डॉ. संजय डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, अमिताभ शर्मा, संग्राम घोरपडे, प्रा. सदानंद सबनीस यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ज्युनिअर कॉलेज
डॉ डी.वाय पाटील ज्यू कॉलेज येथे प्राचार्य ए. बी. पाटील, सायन्स विभाग प्रमुख प्रा.सौ.ए.एस.शिंदे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी 2023-24 या वर्षीच्या “ज्ञानदा” भितीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कदमवाडी: डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे ध्वजवंदन करताना आमदार ऋतुराज पाटील, समवेत डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील, डॉ. के प्रथापन, डॉ. आर. के. मुदगल, डॉ व्ही. व्ही. भोसले, डॉ. ए. के. गुप्ता, संग्राम घोरपडे आदी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…