no images were found
नवी चरित्रकथा “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची”
ऑगस्ट, २०२३ : “आई” हा शब्द ऐकताच आपण जगातलं सगळं दु:ख विसरून जातो. ती सोबत असली कि कितीही मोठा अडथळा आपण हिंमतीने पार करतो. आई आयुष्यात असणं, तिचं प्रेम मिळणं हे भाग्यचं ! पण, समाजात अशीदेखील मुलं असतात जी आईच्या वात्सल्यापासून, प्रेमापासून वंचित राहतात. तो आधार, ती माया त्यांच्या नशिबात नसते. पण, महाराष्ट्रात अशी एक व्यक्ती होऊन गेली जिने या अनाथ मुलांना आपलंस केलं, मातृत्वाचा झरा बनून ती लाखो लेकरांची आई बनली. त्यांनी या मुलांचे फक्त संगोपनच केले नाही तर त्यांना जगण्याची नवी उमीद दिली… मार्ग दाखवला.
या समाजात अभिमानाने कसं जगायचे ते शिकवलं. त्यांच्या या प्रवासाचा मार्ग काटेरी वाटांनी, अनेक अडथळयांनीं आणि समस्यांनी भरलेला होता. पण, जणू लहान पणापासूनच हे निभावून नेण्याची प्रेरणा त्यांना अनेक कसोटीच्या क्षणांनी आणि वडिलांच्या पाठबळाने मिळाली. दैवाने त्यांना घडवले. कारण पुढे जाऊन त्यांना खूप मोठं कार्य करायचं होतं. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं अशी मूर्तिमंत अनाथांची आई म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित “सिंधुताई सपकाळ”. त्यांचा महाराष्ट्राच्या अनाथ लेकरांची माई बनण्यापर्यंतचा प्रवास हा अंगावर शहारे आणणारा, काळीज पिळवटून टाकणारा होता. कुठून आणि कसा सुरु झाला हा प्रेरणादायी प्रवास ? चिंधी अभिमान साठे पासून सिंधुताई सपकाळ कशी घडली ? हा प्रवास आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कारण, कलर्स मराठी सादर करीत आहे मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदा नवी चरित्रकथा “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” १५ ऑगस्टपासून संध्या. ७.०० वा. चिंधीची भूमिका अनन्या टेकवडे साकारणार असून किरण माने अभिमान साठे चिंधीचे वडील, योगिनी चौक हिरु साठे चिंधीची आई तर प्रिया बेर्डे पार्वती साठे चिंधीच्या आजीची भूमिका साकारणार आहे.