no images were found
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते या अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजपाच्या वतीने निदर्शने
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. पण, काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात, मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा धर्मवीर असा करू नये ते धर्मवीर नव्हते, असे अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना म्हणले. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौकात तीव्र जोरदार निदर्शने करून अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी अजित पवारचा धिक्कार असो, अजित पवारचे करायचे काय, खाली डोक वर पाय, धरणबहाद्दुर अजित पवार, जनता करेल तुला तडीपार, अजित पवार कौन रे पायतान मारा दोन रे अशा घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर , सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी तीव्र शब्दात अजित पवारांन विरुद्ध घोषणा व भाषण करून निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो अशा धर्मवीर छ. संभाजी महाराजांना अजित पवार म्हणतात कि, छ. संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत. छ. संभाजी महाराजांनी आपल्या देहाची हाल अपेष्टा सहन केली पण धर्म बदलला नाही, औरंगजेबला टक्कर दिली अशा महाराजांना बोलण्याचे धाडस अजित पवार यांनी केले. पवार घराणे कायम धर्मावरती राजकारण करत आले आहे, कधी आपल्या धर्मा विषयी चांगले बोललेले नाहीत, अशा या पवार कुटुंबाला आज धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि महाराष्ट्राची जनता त्यांना चांगलाच धडा शिकवेल यात शंका नाही. प्रत्येक वेळी जातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम पवार कुटुंबाने केले पण महाराष्ट्राची जनतेला चांगलेच माहित आहे कि, जशास तसे उत्तर कसे द्यायचे आणि नक्कीच महाराष्ट्राची जनता अजित पवार यांना त्यांची जागा दाखवून देईल असे सांगितले.
यावेळी बोलताना भाजपा प्र.का सदस्य महेश जाधव म्हणाले कि, ज्या छ. संभाजी महाराजांनी आपल्या देशाचे नाव सातासमुद्रा पार नेले अशा छ. संभाजी महाराज यांच्या विरुद्ध बोलून छ. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या अजित पवारचा धिक्कार असो असे सांगितले. धर्मवीर छ. संभाजी महाराजांना धर्मवीर हे कोणत्या नेते मंडळीने नाही म्हणलेले हिंदुस्थानातील तमाम विदवानांनी छ. संभाजी महाराजांना धर्मवीर असे म्हणले आहे. पवार यांनी बोलताना जरा जिभेवरती भान ठेवून बोलले पाहिजे. छ. संभाजी महाराजांचा इतिहास बघितला तर छ. संभाजी महाराजांनी एकही लढाई हारलेली नाही अशा धर्मवीर छ. संभाजी महाराज यांच्या विरुद्ध बोलणे चुकीचे आहे असे सांगत निषेध व्यक्त केला.
यावेळी भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्रानी, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, अमोल पालोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, विजय आगरवाल, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, रवींद्र मुतगी, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विजयसिंह खाडे-पाटील,
प्रताप देसाई, सुभाष रामुगडे, सुजाता पाटील, महादेव बिरंजे, सुनील वाडकर, राजू जाधव, नरेश जाधव, अमर साठे, धीरज पाटील, विजय दरवान, डॉ. आनंद गुरव, अशोक लोहार, महेश यादव, रमेश दिवेकर, मानसिंग पाटील, दत्ता लोखंडे, ओमकार गोसावी, विवेक वोरा, राजेंद्र वडगावकर, गिरीश साळोखे, प्रणव पोवार, सुनील पाटील, सचिन जाधव, अमित टिकले, राहूल घाटगे, रोहित कारंडे, प्रकाश घाडगे ई. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.