
no images were found
धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदीसाठी मुदतवाढ
कोल्हापूर : जिल्ह्यात शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत माहे डिसेंबर २०२३ पासुन ९ धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु असुन शासन स्तरावरुन धान खरेदीकरीता ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
माहे २९ फेब्रुवारी २०२४ अखेर जिल्ह्यातील ९२१ शेतक-यांनी १०२४३.७४ क्विंटल धान व २१४ शेतक-यांनी १५९७.२८ क्विंटल नाचणी (रागी) खरेदी केंद्रावर विक्री केली आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांनी नोंदणी केली आहे. परंतु अद्याप खरेदी केंद्रावर धान विक्री केली नाही, अशा शेतक-यांना धान विक्री करीता दि. ३१ मार्च २०२४ पर्यत शासन स्तरावरुन मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांना खरेदी केंद्राचा एसएमएस आला आहे. त्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर धान विक्री करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले आहे.