no images were found
दुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेत
कोल्हापूर : जिल्ह्यातील दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या लाभार्थींनी हयातीचे दाखले वर्षातून दोन वेळा (मे/जून व नोव्हेंबर/डिसेंबर) या महिन्यात जमा करावयाचे आहेत. कार्यालयात हयातीचे दाखले प्राप्त झालेल्या लाभार्थींची अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येते. तरी ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले दिलेले नाहीत. त्यांनी लवकरात लवकर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय विश्रामगृह जवळ, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष किंवा zswo_kolhapur@maharashtra.gov.in या ई मेलवर हयातीचे दाखले जमा करावेत. तसेच हयातीचे दाखले जमा झालेची खात्री करण्यासाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्र. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.