
no images were found
गोदरेज अॅग्रोव्हेटच्या डबलच्या नवीन पॅकेजिंगचा जोरदार धमाका
गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या (जीएव्हीएल) क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे बायोस्टिम्युलंटडबलबाजारपेठेत अतुलनीय जोर पकडत असल्याचे कंपनीतर्फे आज सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे बनावट उत्पादनांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने नुकत्याच सादर करण्यात आलेल्या डबलच्या पॅकेजिंगला चॅनल भागीदार आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
जीएव्हीएलने गेल्या महिन्यात डबलची २५ वर्षे पूर्ण करण्यासाठी नवीन सेलिब्रेटरी पॅक आणला. वापरायला एकदम सुलभ आणि सुरक्षित पॅकेजिंग बाटली, डुप्लिकेशन (बनावटपणा) टाळण्यासाठी छेडछाड केली गेल्यास सिद्ध होईल असे सील आणि जटिल वॉटरमार्क यात आहेत. याव्यतिरिक्त, सत्यता सुनिश्चित करण्यासाठी बाटलीवर होलोग्राम देखील आहे आणि दृष्टिहीन लोकांसाठी टोकाशी धोकादायक अर्थाने ‘ब्रेल’ लिपीत चिन्हांकितही करण्यात आले आहे.
उत्पादन आणि नवीन पॅकेजिंगबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी, कंपनीने डबल डेमो मंच सुरू केला आहे. १५ जुलैपासून सुरू झालेला हा मंच या वर्षी १५ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवत कंपनी सर्व समस्यांचे सक्रियपणे निराकरण करण्यासाठी आणि योग्य आणि शिफारस केलेल्या प्रमाणात अस्सल उत्पादनाच्या वापरासंबंधीच्या फायद्यांबद्दल शेतकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी कापूस उत्पादक राज्यांमध्ये ६,००० प्रात्यक्षिके आयोजित करण्याची योजना आखत आहे.
गेल्या २५ वर्षांमध्ये, डबलने परिवर्तनशील बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि जवळपास ३ कोटी एकर शेतजमिनीवर प्रक्रिया केली आहे. त्यामुळे अंदाजे २ कोटी शेतकरी कुटुंबांचे जीवन लक्षणीयरित्या सुधारले आहे. जीएव्हीएल शेतकर्यांना सक्षम बनवण्याच्या, शाश्वत शेती पद्धतींना चालना देण्याच्या आणि देशाच्या कृषी विकासात योगदान देण्याच्या आपल्या ध्येयात स्थिर, अविचल आहे.