
no images were found
कोल्हापूर जिल्ह्यांला पावसाचा येलो अलर्ट; राज्यात आजही पावसाने ठिकठिकाणी लावली लावली
आजही राज्यात पावसानं ठिकठिकाणी लावली लावली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर सर्वत्र जोरदार पाऊस पडला. तसेच मराठवाडा विदर्भातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने धरणातील जलसाठयात वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी धरणक्षेत्र वगळता पावसाने बहुतांश ठिकाणी विश्रांती घेतली. राधानगरी धरण १०० टक्के भरलं आहे. हिंगोली जिल्हयातील ८ मंडळात जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ५७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मात्र पूर परिस्थिती ओसरली आहे. सांगली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे.
आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांना काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि विदर्भातील चंद्रपुर गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात काही थकांनी काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
तसेच कोकणातील मुंबई, सिंधुदुर्ग, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह कोल्हापूर, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव त्याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.