Home आरोग्य यूकेमध्ये लस निर्मितीसाठी सीरमशी करार

यूकेमध्ये लस निर्मितीसाठी सीरमशी करार

12 second read
0
0
27

no images were found

यूकेमध्ये लस निर्मितीसाठी सीरमशी करार

मुंबई. :जागतीक क्षेत्रात नाव आसलेल्या वोक्हार्ट लि. या फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी समूहाने आपल्या व्यवसाय संचालनात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण धोरणात्मक उपक्रम हाती घेतले आहेत.  यूएस व्यवसायाची पुनर्रचना, यूकेमध्ये लस निर्मितीसाठी सीरमशी लस करार आणि व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन प्रतिजैविक संशोधनावर  कंपनी लक्ष ठेवत आहे.  कंपनीने २०२३ च्या चवथ्या तिमाहित आपल्या महसुलात ७ टक्के वार्षिक वाढ, EBITDA  इबीआयटीडीएच्या (EBITDA) वाढीसह मजबूत ऑपरेटिंग अशी ४७ कोटी रुपयांची कामगिरी बजावली आहे.

 आपल्या यूएस ऑपरेशन्सची पुनर्रचना करताना, कंपनी मॉर्टन ग्रोव्हमधील आपली उत्पादन सुविधा बंद करत असून साइट कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग संस्थांना हस्तांतरित करत आहे. पुनर्रचनेमुळे युएस डॉलर १२ दशलक्ष वार्षिक बचत होण्याची अपेक्षा आहे. पुनर्रचना केल्यानंतर, कंपनीला ४० टक्के सकल मार्जिनसह विक्री कायम ठेवायची आहेत, तर तृतीय पक्षांमार्फत काही उत्पादने जास्त मार्जिनसह तयार करायची आहेत.

 याव्यतिरिक्त, मार्च २०२२ मध्ये कंपनीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोबत ५१:४९ (वोक्हार्ट ५१ आणि सीरम ४९) संयुक्त उपक्रमावर स्वाक्षरी केली होती, ज्यामुळे यूकेच्या सुविधेमध्ये लस तयार करण्यात आली होती. आरक्षण क्षमतेत योगदान म्हणून, वोक्हार्टला £10 दशलक्ष मोबदला मिळाला आहे. सीरमसोबतचा करार १५ वर्षांतील १५० दशलक्ष डोससाठी आहे.  त्यासाठी दोन लसी आधीच ओळखल्या आहेत. नियामक मान्यता आणि प्रात्यक्षिक बॅचनंतर पुढील ८-१२ महिन्यांत या लसींचे उत्पादन करण्याची कंपनीची योजना आहे.

 संशोधन आणि विकास यामध्ये वोक्हार्ट ही अग्रगण्य  कंपनी आहे.  तिच्याकडे अँटीबायोटिक्समध्ये औषध शोधण्याचे विस्तृत कार्यक्रम आहेत. कंपनीच्या सहा कार्यक्रमांना USFDA ने क्वालिफाईड इन्फेक्शियस डिसीज प्रॉडक्ट (QIDP) दर्जा दिला आहे. कंपनीच्या नवीन प्रतिजैविक – Emroc, जे आधीच भारतात बाजारात आले आहे, पुढील सहा ते नऊ महिन्यांत इतर आठ उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.

 वोक्हार्ट ही एक जागतिक फार्मास्युटिकल आणि जैवतंत्रज्ञान संस्था आहे, जी निरोगी जगासाठी परवडणारी, उच्च दर्जाची औषधे प्रदान करते. फार्मास्युटिकल्स, बायोटेक्नॉलॉजी आणि प्रगत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सची साखळी या क्षेत्रातील प्रासंगिकतेसह ही भारतातील आघाडीची संशोधन-आधारित जागतिक आरोग्य सेवा आहे. कंपनीकडे ३संशोधन केंद्रे आणि १२ उत्पादन संयंत्रे आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…