no images were found
२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’
आपल्याकडे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ साठी सज्ज होण्याचं फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे.आणि विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग असणार आहे.
या ‘आणीबाणी’चा जनतेला कोणताही त्रास न होता, फक्त आणि फक्त मनोरंजनाचा दिलखुलास आनंद अनुभवायला मिळणार आहे. कारण ही मनोरंजनाची ‘आणीबाणी’ असणार आहे. दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’ साठी पुढाकार घेतला आहे. ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर बरंच काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखकाच्या सोबतीने दाखवलं आहे.
आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही हलकी-फुलकी गोष्ट आहे. या चित्रपटातील नायकाच्या अभिमन्यूच्या अफलातून संघर्षाची. एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची. नवरा बायकोच्या प्रेमाची आणि सोबत बाप लेकाच्या नात्याची. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ही रंजक कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’ क