Home शैक्षणिक डी.वाय.पाटील ग्रुपच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान

डी.वाय.पाटील ग्रुपच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान

0 second read
0
0
24

no images were found

डी.वाय.पाटील ग्रुपच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान

कोल्हापूर : कर्मचाऱ्यांचे योगदान आणि परिश्रम यामुळे डी वाय पाटील ग्रुपने गरुड भरारी घेतली आहे. 40 वर्षाच्या प्रवासात ग्रुपची जी प्रगती पाहत आहोत त्यामागे कर्मचाऱ्यांचीही मोठी मेहनत आहे. यापुढेही डी वाय पाटील ग्रुपला आणखी उंचीवर नेण्यासाठी सर्वांनीच हातात हात घालून एकदिलाने अधिक चांगले काम करूया, असे आवाहन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी.पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘एक्सलन्स अवार्ड’ प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी ३९ वर्षापूर्वी लावलेल्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय या छोट्याशा रोपट्याचे आता शैक्षणिक वटवृक्ष झाला आहे. शिक्षण,कृषी, सहकार, हॉटेल, कृषी अशा विविध क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे. ग्रुपच्या या प्रगतीत अनेक कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असून त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ‘एक्सलन्स अवार्ड’ ने या कर्मचाऱ्याना गौरवण्यात आले. हॉटेल सयाजी येथे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. आर. के शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. संजय पाटील यांनी, डी वाय पाटील ग्रुपच्या या आजच्या वैभवामागे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मोठे परिश्रम आहेत. डॉ डी वाय पाटील यांनी 1984 साली अभियांत्रीकी महाविद्याय व 1989 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात केली. गेल्या 39 वर्षात शैक्षणिक संस्था, साखर कारखाना, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठ, हॉटेल मॅनेजमेंट, रिसर्च या माध्यमातून डी वाय पाटील ग्रुप कार्यरत आहे. या सर्व प्रवासात असंख्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल प्रातिनिधिक गौरव करताना अतिशय आनंद होत आहे.

विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांचे विचार, प्रेरणा, संस्कार पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्याकडे रोड मॉडेल म्हणून आम्ही पाहतोय. डी वाय पाटील ग्रुपच्या प्रगतीमध्ये सर्वांचे योगदान आहे. आपल्या सर्वांच्या साथीने आणखी प्रगती करू.
विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून मुलांना केवळ उत्तम शिक्षणच नव्हे तर चांगली मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. संस्कारक्षम कार्यक्रम आणि क्रीडा यावर देखील आमचा विशेष भर राहील.

विश्वस्त तेजस पाटील म्हणाले, आमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडणारे अनेकजण आज शासनाच्या सेवेत आहेत. डॉ. डी वाय पाटील यांचा शिक्षणाचा वारसा आमची चौथी पिढी आणखी ताकतीने पुढे घेऊन जाईल याची खात्री देतो.
डी.वाय.पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी प्रास्तविकात, डी वाय पाटील ग्रुपच्या विस्तार व कार्याबाबत माहिती दिली.
प्राचार्य डॉ.महादेव नरके म्हणाले, गेली 25 वर्ष डी वाय पाटील ग्रुप मध्ये कार्यरत असून डी वाय पाटील कुटुंबीया कडून मिळणारे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळे आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते.

यावेळी डॉ. राकेश कुमार मुदगल, डॉ राकेश कुमार शर्मा, प्राचार्य डॉ. सुहास पाटील, अमिताभ शर्मा यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रा. अर्पिता तिवारी व प्रा. राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, सीएचआरओ श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, प्राचार्य डॉ.महादेव नरके, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सयाजी हॉटेलचे जनरल मॅनेजर अमिताभ शर्मा, मार्केटिंग हेड सौरभ जगताप, सिनिअर ग्राफिक डिझायनर समीर पाटील यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांना यावेळी एक्सलन्स अवार्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमा वेळी डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…