no images were found
हिंडनबर्गचा रिपोर्ट खोटा, कोणतंही रिसर्च केलं नाही”; अदानी ग्रुपचा दावा
हिंडनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे.
अमेरिकन फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी हिंडेनबर्ग रिसर्चवर योग्य संशोधन न केल्याचा आणि कॉपी-पेस्ट केल्याचा आरोप केला आहे. त्यात असंही म्हटले आहे की, त्यांनी एकतर योग्य संशोधन केलं नाही किंवा योग्य संशोधन केलं पण लोकांची दिशाभूल केली आहे.
एका वाहिनीला मुलाखत देताना सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी हा आरोप केलाय. हिंडेनबर्गच्या रिपोर्टवर अदानी समुहाने ४१३ पानी निवेदनातून उत्तर दिलंय. त्यानंतर सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना हिंडेनबर्गच्या रिपोर्टने उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी ८८ प्रश्नांना उत्तरं दिली. यातील ६८ प्रश्न हे बोगस आहेत आणि आमचे डिस्क्लोजर्स केवळ कट, कॉपी-पेस्ट केली आहेत, असा खळबळजनक आरोप केलाय. तसंच हिंडेनबर्गने हा रिपोर्ट केली एफपीओचं नुकसान करण्यासाठीच बनवला असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केलाय.