no images were found
मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार- चंद्रकांतदादा पाटील
पुणे : मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून नामदार चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.यावेळी अखिल भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव धरमवीर सिंह, विश्व मल्लखांब फेडरेशनचे संचालक महेंद्र चेंबूरकर, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष अभिजीत भोसले, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष मोहन झुंजे पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्षा राघवेंद्र बापू मानकर, आबासाहेब पटवर्धन क्रीडानगरीचे विश्वस्त सोमनाथ तेंडुलकर, शाहू कला क्रीडा अकादमीच्या संचालिका प्राध्यापिका अनुराधा ऐडके, सचिव राज तांबोळी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मल्लखांब हा आपल्या मराठी मातीतील क्रीडा प्रकार आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार होणे ही आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे हा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. तसेच पुढील वर्षी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.नामदार चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे शाहू कला क्रीडा अकादमीच्या संस्थापिका अध्यक्षा प्राध्यापिका अनुराधा ऐडके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय भव्य दिव्य आणि देखण्या पद्धतीने आयोजन केले. आगामी काळात मल्लखांबसारख्या मातीतील खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी शाहू कला क्रीडा अकादमीला लोकसहभागातून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही नामदार पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी स्पर्धेतील विजेत्या मल्लखांबपटूंना विशेष पुरस्काराची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केली.