no images were found
बेकायदेशीर दानपात्रांबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक
कोल्हापूर : कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात काही ठिकाणी बेकायदेशीर, विनापरवाना दानपात्रांबाबत तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी आज संभाजी ब्रिगडनं मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला.
सजवलेली प्रतिकात्मक दानपात्रे मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला.
दानपात्रे हटवा अन्यथा संभाजी ब्रिगेडची दानपात्रेही ठेवा, अशी भूमिका त्यांनी घेतली.
यावेळी घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला.
मंदिरात गेली काही वर्षं बेकायदेशीर आणि विनापरवाना दानपेटी शेजारी पैसे आणि धान्य गोळा करण्यासाठी बुट्टीची दानपात्रं ठेवली आहेत. त्याविरोधात अनेकदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती तसंच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीच कारवाई होत नाही. आंदोलन जाहीर केल्यावर जमावबंदीचा आदेश असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे प्रशासनानं
त्याची गांभीर्यानं दखल घ्यावी, यासाठी आंदोलन केल्याचं संभाजी ब्रिगेडचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष नीलेश सुतार यांनी सांगितलं.