Home शासकीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांची भेट

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांची भेट

3 second read
0
0
25

no images were found

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांची भेट

कोल्हापूर  – जिल्ह्यातील अनुसूचित जाती व वंचित दुर्बल घटकांच्या विकासामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा मोलाचा वाटा असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांनी व्यक्त केले.

 भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 46 नुसार राज्यातील दुर्बल वंचित व अनुसूचित जाती यांच्या कल्याणासाठी सामाजिक आर्थिक व शैक्षणिक सुविधा पोहोचवून घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर हे कार्यालय कार्यरत आहे.

 जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या विविध शैक्षणिक योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सामाजिक व आर्थिक तसेच शैक्षणिक योजनांची माहिती होण्याकरिता प्रचार प्रसिद्धी कक्ष, ज्येष्ठ नागरिक कक्ष तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फॉर्म भरता यावे याकरिता सुरु करण्यात आलेल्या कॉम्प्युटर लॅबची तसेच तृतीयपंथीयांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय मध्ये स्वतंत्र शौचालयाची सुविधा याबाबत माहिती दिली.

समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती दिली.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …