no images were found
जीतो संघटनेच्या वतीने १०८ कौशल्य कोर्सचा आठवडा
कोल्हापूर – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ही जागतिक स्तरावर आर्थिक सुदृढता, ज्ञान आणि सेवा ही मूल्ये घेऊन सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. या संघटनेच्या मेन चाप्टर लेडीज विंग, यूथ विंगच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १५ ते २१ जुलै २०२३ या आठवड्यामध्ये १०८ कौशल्यांचा ऑनलाईन मॅरेथॉन ‘स्कीलोथान ‘ हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
जगातील २६ देशांत आणि देशात ६५ चाप्टरच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. धावपळीच्या जगात फक्त शिक्षण घेऊन चालत नाही तर विविध स्तरावर आपली कौशल्ये विकसित केली पाहिजेत तरच आपला विकास होणार आहे. म्हणून १०८ रुपयांत १०८ प्रकारची कौशल्य विकास प्रशिक्षण आपणास मिळणार आहे. त्यासाठी विविध विषय घेऊन प्रत्येक विषयावर ९ ते १२ ऑनलाईन सेमिनार होणार आहेत. यामध्ये पर्सनल अकौंट आणि फायनान्स ९, हेल्थकेअर न्युट्रिशन ०९ , पर्सनल डेव्हलपमेंट ०९, बिजनेस डेव्हलपमेंट ०९, नेटवर्क मार्केटिंग कोलाब्रेशन ०९, व्हर्च्युल कम्युनिकेशन स्कील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ०७, इंटरनरशीप ०९ , लीगल रेग्युलेटर स्कील ०९ , लाइफ स्कील ०९ , डिजिटल मार्केटिंग १२ , क्रिएटिव्ह आणि आध्यात्मिक अशा विषयांवर सेमिनार होणार आहेत. मधुर भांडारकर, विकास खन्ना, नवाजुद्दिन सिद्दीकी, डब्बू रत्नांनीं सारख्या नामवंतांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. सात दिवसांत १०८ कौशल्ये ऑनलाईन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये उद्योजक, व्यावसायिक, महिला, तरुण विद्यार्थी भाग घेऊ शकतात. त्यासाठी https://bstg.me/3JnAq4p या लिंकवर ऑनलाईन रजिस्टर करणे आवशक आहे. अधिक माहितीसाठी जीतो चेअरमन गिरीश शहा, सेक्रेटरी अनिल पाटील, लेडीज विंग चेअरमन श्रेया गांधी, माया राठोड, यूथ विंग चिंतन राठोड, सेक्रेटरी चिन्मय कर्नावट यांच्याशी संपर्क साधावा.